शालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश

शालेय प्रवेशासाठी मुलाच्या वयोमर्यादेची अट किती असावी याबाबत सातत्याने धोरणबदल होत आहे. आता त्यानुसार इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी मुलांचे वय वर्षे 6 निश्चित करण्यात आले. त्यासाठी 31 जुलै पर्यंत वयाची 6 वर्षे पूर्ण असलेल्या मुलांना प्रवेशासाठी योग्य मानले गेले आहे. यापुढे आता शालेय प्रवेशासाठी 31 डिसेंबरपर्यंतचे वय गृहीत धरले जाणार आहे. जे या पुर्वी 15 ऑक्टोबरपर्यंतचे होते. त्यामुळे वयाची सहा वर्षे पूर्ण ही अट कागदोपत्रीच राहणार असल्याचे दिसते. तसेच, सहा वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळत असला तरी प्रत्यक्षात मात्र साडेपाच वर्षे वयाची मुलेही शालेय शिक्षणाचा श्रीगणेशा करताना दिसणार आहेत.
मात्र जी मुले 15 ऑगस्ट पर्यंत जन्माला आली आहेत त्यांचे केवळ 15 दिवसांसाठी शालेय वर्ष बाद करायचे का? त्यामुळे अनेक पालकांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे पालकांच्या मागणीचा विचार करत सरकारने 2017 मध्ये पुन्हा विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाच्या वयोमर्यादेत बदल केला. 31 सप्टेंबर पर्यंत 6 वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल हे जाहीर केले. परंतू, पुन्हा ऑक्टोबर महिन्यातील मुलांचे करायचे काय हा प्रश्न पुढे आलाच. हा गोंधळ 2010 पासून सुरुच आहे.
अखेर सर्व बाबींचा विराच करुन पुढील शैक्षणिक वर्षांपासून (2021/22) 31 डिसेंबपर्यंत सहा वर्षे पूर्ण होत असलेल्या मुलांना जूनमध्ये पहिलीच्या वर्गात बसवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे नियमाच्या चौकटीत जरी 6 वर्षे वयाचा उल्लेख असला तरी तो केवळ कागदोपत्रीच राहणार आहे. त्यामुळे साडेपाच वर्षांच्या मुलांना 6 वर्षे वयाच्या मुलांसोबत अभ्यासक्रमाचे धडे गिरवत भार सोसावा लागणार आहे.





