माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात
अपघाताची भीषण घटना कारने उडवले, रुग्णालयात उपचार सुरू
नाशिक : माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात (Accident) झाला असून घराजवळ नातवासोबत फेरफटका मारत असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. पाठीमागून येणाऱ्या चारचाकी कारने निर्मला गावित यांना उडविले. या अपघातात माजी आमदार निर्मला गावित गंभीर जखमी झाल्या आहेत. इगतपुरी विधानसभा (igatpuri) मतदारसंघातून त्यांनी 2014 साली आमदारकी मिळवली होती. ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला होता.
नाशिकच्या एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात निर्मला गावित यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल सोमवारी झालेल्या अपघातातील या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आज समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, कारने अगदी पाठीमागून त्यांना उडवल्याचं व्हिडिओ पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : लाडकी बहीण व शेतकऱ्यांच्या योजना कधीही बंद होणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोण आहेत निर्माला गावित
निर्मला गावित या मूळच्या काँग्रेसवासी आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. निर्मला गावित या दोनवेळा आमदार राहिल्या आहेत. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर, शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2019 ला शिवसेनेत आले होते. आता नेतृत्व बदललं आहे. पक्ष शिवसेनाच आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन असू द्या. आजपासूनच मी कामाला लागणार आहे, असं निर्मला गावित पक्षप्रवेशावेळी म्हटलं होतं.




