हदगाव तालुक्यात अवघ्या २५ वर्षे वयाच्याउपसरपंचाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ
![Excitement over the suspicious death of a 25-year-old sub-panch in Hadgaon taluka](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/sucide-2_2017071684.jpg)
नांदेड | जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वरुला महाताळा गावचे तरुण उपसरपंच अविनाश बंडू भोयर(२५) याच्या संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
भोयरचा मृतदेह माळरानात टेकडीच्या बाजूला आढळून आला असून त्याच्या पाठीवर दोरीने मारल्याचे व्रण दिसत आहेत,तसेच गळ्यावरही आवळल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत.
डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा गळा आवळल्यामुळे आणि मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष व्यक्त केला आहे.वरुला येथील पोलीस पाटील गणेशराव भोयर यांचा पुतण्या अविनाश बंडू भोयर हा परवापासून कामानिमित घराबाहेर पडला होता.तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नव्हता.त्यानंतर कुणीतरी अविनाशला फोन करून सांगितले की अविनाश हा कोळी आणि तळणी दरम्यान असलेल्या माळरानात टेकडीच्या बाजूला मृतावस्थेत पडलेला आहे. त्यावेळी कुटुंबीयांनी घटनास्थळीअविनाशचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलीसांना कळविण्यात आले.कुटुंबीयांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे.तर डॉक्टरांच्या तपासणीतही हीच शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे.हदगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.