तीन दिवसांच्या चढाईनंतर नरमले सोने-चांदी! जाणून घ्या आजचे दर
![Drop in gold-silver rates, know today's rates](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Gold-Silver-Rate-Today-1-780x470.jpg)
Gold Silver Rate Today | गेल्या आठवड्यात सोन्याने ७५ हजारांचा टप्पा ओलांडला होता. तर चांदी ९६ हजारांच्या घरात पोहचली होती. अशातच या आठवड्याच्या सुरुवातीला तीन दिवसांत सोन्याच्या किंमतीत ७५० रुपयांची वाढ झाली होती. या दरवाढीला ब्रेक लागला. सोने-चांदीत पडझड झाली.
गुडरिटर्न्सनुसार, आज २२ कॅरेट सोने ६६,८५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,९१० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. या आठवड्यात चांदीने तीन दिवसांत ६ हजारांहून अधिकची झेप घेतली होती. तर आज गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ९६,५०० रुपये आहे.
हेही वाचा – पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल, पहा पर्यायी मार्ग
२४ कॅरेट सोने ७२,११५ रुपये, २३ कॅरेट ७१,८२६ रुपये, २२ कॅरेट सोने ६६,०५७ रुपये झाले. १८ कॅरेट ५४,०८६ रुपये, १४ कॅरेट सोने ४२,१८७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव ९२,६७३ रुपये झाला. मात्र ग्राहकांनो ही गोष्ट लक्षात घ्या की, सराफ बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते.