Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

‘सनातन धर्म वाचवायचा असेल तर हिंदूंनी ५ मुलं जन्माला घालावीत’; देवकीनंदन यांचं विधान

Devkinandan Thakur | देशातील लोकप्रिया आणि कायम चर्चेत असणारे कथावाचक महाराज देवकीनंदन यांनी केलेल्या विधानावरुन आता चांगलाच गोंधळ सुरू झाला आहे. देवकीनंद यांनी हिंदुंना ५-५ मुलांना जन्म देण्याचा सल्ला दिला आहे. वक्फ बोर्डाप्रमाणे देशात सनातन बोर्डही असावा. देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा असावा, असं त्यांनी म्हटलंय.

देवकीनंद ठाकूर म्हणाले की, आपण एकट्याने केवळ कुटुंब नियोजन करावे आणि इतरांनी कुटुंब वाढवलं पाहिजे. मी लोकसंख्या नियंत्रणासाठी याचिका दाखल केली आहे. आता आपण दीडशे कोटींवर गेलो आहोत. मात्र हा कायदा होईपर्यंत हिंदुंना लोकसंख्या तरी वाढवता येतील. सनातनांना निदान मुलं तरी होतील. आम्हाला एकच पत्नी ठेवण्याचा अधिकार असेल तर प्रत्येकाला एकच पत्नी ठेवण्याचा अधिकार द्या. जर आपल्याला एक मूल असेल तर प्रत्येकाला दोन मुले असावीत.

हेही वाचा    –      दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर, न्यायालयाने दिले निबंध लिहिण्याचे आदेश 

वक्फ बोर्डाला जे अधिकार दिले आहेत तेच सनातन बोर्डालाही अधिकार मिळावा. मथुरा येथे श्रीकृष्णजन्मभूमीवर पाठिंबा देण्याचं आवाहन देवकीनंदन शास्त्री यांनी केलं आहे. मंदीर उभारणीला सर्व विरोधी पक्षनेत्यांनी पाठिंबा दिल्यास आम्ही पाठिंबा देऊ, असंही देवकीनंदर ठाकूर म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button