Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; ISI चा टेरर प्लॅन उधळला, ८ जण अटकेत

नवी दिल्ली | दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT), आयएसआय आणि बांगलादेशस्थित अतिरेकी संघटनांशी कथित संबंध असलेल्या एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील तिरुप्पूर जिल्ह्यातील गारमेंट युनिट्समधून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले, तर उर्वरित दोघांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मिजानुर रहमान, मोहम्मद शबत, उमर, मोहम्मद लिटन, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद उज्जल यांचा समावेश आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, काही आरोपी बांगलादेशी नागरिक असून ओळख लपवण्यासाठी त्यांनी बनावट आधार कार्डचा वापर केला होता.

हेही वाचा     :            एअर स्ट्राईकचा सूड घेऊच; अफगाणिस्तानचा पाकिस्तानला थेट इशारा 

तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, हे मॉड्यूल लष्कर-ए-तैयबाशी जोडलेले असून त्याचा हँडलर काश्मीरचा रहिवासी आहे आणि सध्या बांगलादेशातून कार्यरत आहे. संबंधित हँडलरला पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण मिळाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अटक केलेले संशयित त्याच्या निर्देशांवर काम करत होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी दिल्लीसह अनेक शहरांची हेरगिरी करणारे मोबाईल फोन व्हिडिओ जप्त केल्याचा दावा केला आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील गर्दीची धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे संभाव्य लक्ष्य होती. चांदणी चौक परिसरातील मंदिर तसेच लाल किल्ल्याजवळील भागात आयईडी हल्ल्याचा कट रचला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button