breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#COVID-19 : ‘या’ कारणामुळे राजधानी दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय…!
नवी दिल्ली । टीम ऑनलाईन
देशात कोरोनामुळे हाहाकार सुरू आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्लीबाहेरून आलेले नागरिक कोरोना टेस्ट करीत आहेत. त्यामुळे कोविड रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे, असा दावा दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, दिल्लीतील रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या ३० ते ३५ टक्के रुग्ण हे दिल्लीबाहेरील आहेत, असे जैन यांचे म्हणणे आहे.