Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बोपखेल गावामध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरू करा; सामाजिक कार्यकर्ते भाग्यदेव घुलेंची मागणी

पिंपरी |

बोपखेल गावामध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भाग्यदेव घुले यांनी केली आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन त्यांनी पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे. भाग्यदेव घुले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महापालिकेने प्रत्येक गावामध्ये covid-19 लसीकरण केंद्र चालू केले आहेत. परंतू बोपखेल गावात लसीकरण केंद्र अद्यापही सुरू केले नाही. त्यामुळे बोपखेल गावातील नागरिकांना लस घेण्यासाठी सांगवी, भोसरी किंवा दिघी अशा ठिकाणी जावे लागत आहे.

परंतू त्याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असल्यामुळे बोपखेल गावातील जेष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागत आहे. तरी पिंपरी चिंचवड महापालिकेने बोपखेलमध्ये महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे. बोपखेल गावचा पाहिजेल तसा विकास झालेला नाही. कमीत कमी covid-19 सारख्या महामारीच्या काळामध्ये तरी चांगल्या सुविधा द्याव्यात अशी अपेक्षा बोपखेलमधील नागरिक करत आहेत असे निवेदनात म्हटले आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देतेवेळी भाग्यदेव घुले, दत्तात्रय घुले, नामदेव गोळे, मारुती मोरे, रोहिदास जोशी, बाळू घुले, अशोक वहिले आदी नागरिक उपस्थित होते.

वाचा- आमिर खान करोना पॉझिटिव्ह; उद्धव ठाकरेंसोबत लावली होती कार्यक्रमाला हजेरी

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button