Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: आज देशात कोरोनाचे 45,882 नवे रुग्ण; 584 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली: आज देशात कोविड-19 चे 45,882 नवे रुग्ण आढळून आलेले असून 584 जणांचा मृत्यू झालेला आहे. या नव्या वाढीमुळे कोरोना बाधितांची संख्या 90,04,366 इतकी झालेली आहे. तर मृतांचा आकडा 1,32,162 वर पोहचलेला आहे. सध्या देशात 4,43,794 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. मागील 24 तासांपेक्षा ही संख्या 491 ने अधिक आहे. दरम्यान, 84,28,410 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत 44,807 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.





