देशाच्या चौफेर सुरक्षेसाठी केंद्रात खंबीर सरकारच हवे !

आज अकरा वर्षांपूर्वीचा आपला देश आठवतो. भारतात नियमितपणे कोणत्या ना कोणत्या भागात बॉम्बस्फोट व्हायचे. कोणतीही कारवाई नाही. फक्त शेजारील राष्ट्राचा निषेध केला जायचा.. काँग्रेसवाले तर पाकिस्तानचे नाव घ्यायला सुद्धा घाबरायचे.. तोपर्यंत पाकड्यांची ही हरामखोरी आहे, घरात घुसून मारू, असे म्हणण्याची एकाही राजकारण्याची खासगीत सुद्धा म्हणायची हिम्मत नसायची !
मोदी आले पण सगळंच बदललं..
आज सत्तेवर येऊन नरेंद्र मोदींना अकरा वर्षे पूर्ण झाली. तमाम भारतीयांनी मोठा विश्वास टाकून त्यांना तिसऱ्यांदा कौल दिला. पण, या अकरा वर्षात सर्व आघाड्यांवर त्यांनी भारताचं रुपडं पालटवून दाखवलं ! विज्ञान-तंत्रज्ञानापासून आर्थिक सुबत्तेपर्यंत आणि प्रशासनापासून संरक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्र आज अतिशय सक्षम, कार्यक्षम, पारदर्शक आणि आत्मनिर्भर होत चालले आहे, हे मान्य करावेच लागेल !
मोदींनी सांगितलेल्या चार जाती..
मी जातीयवादी आहे आणि चार जातींसाठी काम करणार असे एकदा मोदी बोलून गेले होते, त्यांच्यासाठी मोदींचे चौफेर काम सुरू आहे. बळीराजा, महिला, युवा आणि देशातील गोरगरीब हे त्यामुळेच मोदींना दुवा देत आहेत. ‘न थकता, न चुकता, न झुकता’ फक्त देशाचे भले हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र काम करणारा आमचा पंतप्रधान.. खरोखर कोटी कोटी प्रणाम, मोदीजी !
नरेंद्र मोदी चुकत आहेत का?
पण, देशाचा विकास उघड्या डोळ्यांनी पाहत असताना कधी कधी असा प्रश्न येऊन जातो, की नरेंद्र मोदी बऱ्याचदा चुकत आहेत का? काँग्रेसच्या लोकांना भाजपात सामील करणं, इतर पक्ष फोडणं, काँग्रेस संपवण्याचं पाऊल टाकणं.. अशा घटना घडल्या की उगीचंच वाटतं.. दया दालमें कुछ काला हैं !
अटलजींसारखा आदर्श नेता !
हे सगळे पाहून अटलजींसारख्या आदर्श नेत्याची आठवण येते, आणि मग मोदी कुठेतरी चुकत आहे, असे वाटून जाते. स्वतःविषयी एक आदर्श मत तयार करण्यात कठोर निर्णयामुळे मोदींना अपयश येते आणि मग विरोधकांच्या हातात टीकेशिवाय दुसरे काहीच राहत नाही !
राजकीय तज्ज्ञामुळे दृष्टिकोन बदलला..
या संदर्भात टीव्हीवर एक उत्तम चर्चासत्र झाले, त्यातील काही राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेली मते एवढी मनाला पटली, की मोदी करत आहेत,ते बरोबरच आहे, असे वाटू लागले.
हेही वाचा : Mission PCMC : महापालिका निवडणुकीत खरी लढत भाजपा अन् राष्ट्रवादीतच!
महत्त्वाच्या शंकांचे निरसन..
नीतीश कुमार यांच्यासोबत पुन्हा एकत्र येणं मला अयोग्य वाटलं होतं. त्या चर्चासत्रातील एक जण इंटेलिजन्स विभागातून निवृत्त झालेला अधिकारी होता. त्याचे म्हणणे शंभर टक्के पटले. माझ्या इतक्या वर्षांच्या नोकरीत, गेल्या ६-७ वर्षांत मी प्रथमच निश्चिंत झालो आहे, की माझ्या मुलीचं भविष्य सुरक्षित आहे, असं तो सांगून गेला. त्यानं पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, आसाम, अरुणाचल, महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा, कर्नाटका, तामिळनाडू, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यांमधील अंतर्गत स्थिती सांगितली आणि जे काही सांगितलं, त्यानं माझे डोळे खाडकन उघडले !
मुस्लिम राष्ट्र बनवण्याचे कारस्थान..
त्या अधिकाऱ्यांनं सांगितलं, की भारताला पूर्णपणे मुस्लिम राष्ट्र बनवण्याचं कट-कारस्थान इंदिरा गांधींच्या काळापासूनच चालू होतं, पण खऱ्या अर्थानं यश २००४–२०१४ या डॉ. मनमोहन सिंहांच्या कार्यकाळात मिळालं. काँग्रेसची कपटनीती नरेंद्र मोदींच्या कूटनीतीमुळे चव्हाट्यावर आली आणि मोदींनी ती संपवली. अतिशय कटू सत्य तो अधिकारी सांगत होता.
मुस्लिम गुंडांची दहशत..
वरील सर्व राज्यांत मुस्लिम गुंड खुलेआम दहशत माजवत होते, बलात्कार, अमली पदार्थ यांचा सुळसुळाट होता. या प्रकारची सर्व माहिती आमच्याकडे यायची, पण, शासनाकडून कोणतीही कारवाई होत नसे. आम्हाला शांत बसावं लागायचं, आमचे हात बांधलेले होते, असे तो इंटेलिजन्स चा अधिकारी स्पष्टपणे बोलत होता.
हिंदूंमध्ये प्रतिकार करण्याची ताकद नव्हती..
या राज्यांतील हिंदू भीतीमुळे चूप बसत, त्यांच्या बहिणी-मुलींचा अपमान झाला तरीही! प्रतिकार करण्याची ताकद नव्हती त्यामुळे ते स्थलांतर करत. पश्चिम बंगालमधील संदेशखालीचा उल्लेख त्यांनी केला, आणि ते सत्य असेच वास्तव ऐकताना चीड येऊन हाताच्या मोठी वळू लागल्या ! त्याने सांगितले, आजही तुम्ही गूगल सर्च करा, दरवर्षी देशभरातून किती मुली गायब होतात ते ! त्यात ९५ टक्के हिंदू आणि ३ टक्के ख्रिश्चन किंवा शीख असतात, ही वस्तुस्थिती आहे.
लव्ह जिहादनंतर थांगपत्ता नाही..
लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या हिंदू मुलींचा पुढे थांगपत्ताही लागत नाही. हत्या करून त्यांच्या अवयवांची तस्करी चेन्नई, बंगाल, बिहारमार्गे नेपाळ आणि श्रीलंकेत केली जाते, आणि हे सर्व अधिकाऱ्यांना तसेच राजकारण्यांनाही माहीत होते. पण सगळ्यांची या विषयावर चुप्पी !
काही शहरे तर मिनी पाकिस्तान..
नरेंद्र मोदी यांचे राज्य सुरू झाले आणि पहिल्या कार्यकाळात आम्हाला हिम्मत मिळाली. आम्ही खुल्या दिलाने माहिती द्यायला लागलो. काही गद्दार होते, पण तरीही पुढे गेलो, आमची माहिती ऐकून घेतले गेली आणि लगेच पावले देखील उचलली गेली.
दुसरा कार्यकाळ अधिक आक्रमक..
दुसऱ्या कार्यकाळात जेव्हा भारतीयांनी पुन्हा मोदींवर विश्वास टाकला, तेव्हा नरेंद्र मोदी, अमित शाहा, योगी आदित्यनाथ, हेमंत बिस्वा शर्मा, पुष्कर धामी, राजनाथ सिंह, अजित डोवाल, एस. जयशंकर यांची टीम अत्यंत नियोजनपूर्वक आणि शिस्तबद्धतेने काम करू लागली. खऱ्या अर्थाने त्यांनी देश वाचवला. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटकसारख्या राज्यांत विरोधकांशी हातमिळवणी केली, केवळ मुस्लिम समर्थक पक्ष सत्तेत येऊ नयेत म्हणून !
याचे परिणाम काय झाले?
या सर्व गोष्टींचा पहिला फटका बॉलीवूडला बसला. बॉलीवूड एकदम शांत झाला. कोल्हेकुई बंद झाली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशविरोधी आंदोलन थांबले. तिकडे जम्मू काश्मीर शांत झाला. मिनी पाकिस्तान बनलेल्या शहरांमधील दंगली थांबल्या.
दहशतवादी घटनांना एकदम ब्रेक..
या सर्व तातडीच्या उपाययोजनांमुळे उत्तर प्रदेशात स्थलांतर थांबून उद्योग सुरू झाले. अतीक अहमदसारखे डॉन संपले.अंसारी, आझम खान यांचा प्रभाव कमी झाला, त्यामुळे संपूर्ण देशात सर्वत्र विखरलेले तथाकथित मुस्लिम डॉन एकदम थंडावले. त्यांना समोर मृत्यूचे भय वाटू लागले !
श्रीराममंदिर उभारणीमुळे हिंदूं एकत्र
पण, अजून अंतिम लढाई बाकी आहे. हल्द्वानीत पोलिसांवर हल्ला झाला. अशा प्रकारचे हल्ले पुढेही होतील, याची कल्पना टीम मोदीला आहे. यामुळे हिंदूंना एकत्र करून त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन तळागाळातील कार्यकर्ते करीत आहेत.
मोदींना खंबीर साथ देण्याचे आवाहन !
त्या छोट्याशा चर्चासत्रामध्ये तो अधिकारी बरेच काही सांगून गेला. हिंदूंनी एकत्र येऊन बहिणी, मुली आणि सनातन धर्मासाठी मोदीजींना साथ दिली पाहिजे, हा त्याचा आग्रह होता. गेल्या १० वर्षांत एकही दिवस मोदींनी ऐषारामी किंवा देशविरोधी वागणूक दाखवली नाही. त्यांच्या कुठल्याही नातेवाइकांनी घोटाळा केलेला नाही. हा एक पुरावा आहे की मोदी राष्ट्रासाठी जगतात, हे संपूर्ण देशातील मतदारांनी लक्षात घ्यायला हवे असे त्याने शेवटी सांगितले.
विचारसरणीतील फरक..
जिथे आपली विचारशक्ती संपते, तिथून मोदी व त्यांच्या टीमची विचारशक्ती सुरू होते, हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले आहे आणि त्यात खूप तथ्य आहे. जसं आपण विमान, ट्रेन, बसमध्ये बसून प्रवास करताना आपल्या चालकावर विश्वास ठेवतो. तसंच देशाचं नेतृत्व मोदीजी करत आहेत,डोळे झाकून विश्वास ठेवा, असे आज सर्वांनाच वाटायला लागले आहे. मोदींसाठी ‘राष्ट्र सर्वोपरि’ आहे, हे लक्षात घ्या आणि मोदीविरोधकांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न करा, असे उद्गार त्या अधिकाऱ्याने शेवटी काढले, जे प्रत्येकाच्या मनाला नक्कीच भावून गेले असणार, यात शंका नाही !