Breaking-newsताज्या घडामोडी

#CoronoVirus:नागपुरात कोरोनाचे 17 नवे रुग्ण, आकडा 124 वर

नागपूर : राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. काल राज्यात एकूण 811 कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर नागपुरातही काल रात्री 17 रुग्णांचे कोविड-19 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.

नागपुरात शनिवारी दिवसभरात 19 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या 124 झाली आहे. नागपुरात रुग्ण वाढत असले तरी कोरोना नमुने निगेटिव्ह येण्याचे प्रमाणही मोठे आहे.

नागपुरात 25 एप्रिलपर्यंत विदर्भातून आलेल्या एकूण 2043 नमुन्यांमधून तब्बल 1836 नमुने निगेटिव्ह आले आहेत. ही बाब आरोग्य यंत्रणेला दिलासा देणारी आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू निदान प्रयोगशाळेत काल पहिल्या फेरीत 30 नमुने तपासण्यात आले. यात सतरंजीपुरा येथील 24 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळून आला. पाच दिवसांपूर्वी या रुग्णाला संशयित म्हणून वनामती येथे दाखल करण्यात आले होते. तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेने 55 नमुने तपासले .

नव्याने वाढ झालेल्या 19 रुग्णांमध्ये तब्बल 17 रुग्ण हे वानाडोंगरी क्वारंटाईन केंद्रातील आहेत. या रुग्णांमुळे आता नागपुरात रुग्णांची संख्या 124 वर पोहोचली आहे. यातील 22 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button