Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: स्पेनमध्ये २४ तासांत ४६२ जण दगावले

स्पेनमध्ये २४ तासांत ४६२ लोक दगावल्यामुळे देशात करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २ हजार १८२ झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले. एक दिवसापूर्वी जारी करण्यात आलेल्या मृत्युदराच्या आकडय़ांमध्ये २७ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.





