Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus | राज्यात कोरोनाचे ६७८ नवे रुग्ण, मृत्यूची संख्या ५२१ वर

मुंबई | राज्यात ६७८ नविन रूग्ण वाढले असून २७ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतची एकूण रूग्णसंख्या १२,२९६ वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या ५२१ वर पोहोचली आहे. राज्यात आज एकूण कोरोना बाधित १२१ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची दिलासादायक बातमी देखील समोर आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

राज्यात १ लाख ७४ हजार ९३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२ हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ३६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ५२१ आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २७, पुणे शहरातील ३, अमरावती शहरातील २, तर वसई विरार मधील १, अमरावती जिल्ह्यामधील १ तर औरंगाबाद मनपामधील १ मृत्यू आहे. या शिवाय प. बंगालमधील एका जणाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button