Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: राज्यांकडून आकडेवारीची नेमकी माहिती
राज्यांकडून करोना रुग्णांची नेमकी संख्या केंद्राला दिली जात नाही, असा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. आतापर्यंत केंद्र व राज्ये एकत्रित काम करत आली आहेत. त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. राज्यांनी करोना रुग्णांची संख्या लपवलेली नाही. राज्यांकडून रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण केले जाते. त्यानुसार त्याची वर्गवारीही केली जात आहे, असे अगरवाल म्हणाले.





