breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus | देशात मागील 24 तासांत 103 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली | देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत 103 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 30 हजार पार पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ‘आतापर्यंत 85 हजार 940 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 2752 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 30 हजार 153 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जाणून घ्या देशभरातील सर्व राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक 1068, गुजरातमध्ये 606, मध्यप्रदेशमध्ये 239, पश्चिम बंगालमध्ये 225, राजस्थानमध्ये 125, दिल्लीमध्ये 123, उत्तर प्रदेशमध्ये 95, आंध्रप्रदेशमध्ये 48, तामिळनाडूमध्ये 71, तेलंगणामध्ये 34, कर्नाटकात 36, पंजाबमध्ये 32, जम्मू-काश्मीरमध्ये 11, हरियाणामध्ये 11, बिहारमध्ये 7, केरळमध्ये 4, झारखंडमध्ये 3, ओडिशामध्ये 3, चंदिगढमध्ये 3, हिमाचल प्रदेशमध्ये 3, आसाममध्ये 2 आणि मेघालयमध्ये एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button