Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus | देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या २१,००० च्या वर
![# Covid-19: Corona test not required for interstate travel - ICMR](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/corona-test.gif)
नवी दिल्ली | भारतात कोरोना विषाणूचे रुग्ण सतत वाढत आहेत. गुरुवारी देशात कोरोना विषाणूची एकूण संख्या 21 हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, या महामारीमुळे आतापर्यंत 681 लोकांचा बळी गेला आहे. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 21393 वर पोहोचली आहे.
बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत देशात 20471 रुग्ण होते तर 652 लोकांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच तेव्हापासून आतापर्यंत या महामारीमुळे देशभरात एकूण 1000 रूग्ण वाढले आहेत आणि तीस हून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील कोरोना विषाणूपासून बरे होणाऱ्यांची संख्याही सतत वाढत आहे. या साथीच्या आजाराशी लढा देऊन आतापर्यंत जवळपास 4258 लोकं बरे झाले आहेत आणि त्यांना सोडण्यात आले आहे.