Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशभरात रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ…

नवी दिल्ली: देशभरात कोरोना व्हायरसचा अतिशय झपाट्यानं वाढणारं प्रमाण प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढं अनेक आव्हानं उभी करत आहे. अनेक प्रयत्नांनंतरही देशात सातत्यानं वाढणारा कोरोना विषाणूचा संसर्ग बाधित रुग्णांचा आकडा मंगळवारी सुद्धा याच वेगानं पुढे गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १५ लाखांच्याही पार गेलेला आहे. १५ लाख ३१ हजार इतक्या रुग्णसंख्येसह देशात कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा ३४,१९३ वर पोहोचला आहे. 

मागील चोवीस तासांमध्ये देशात कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ७६८ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सद्यस्थितीला देशात तब्बल ५,०९,४४७ रुग्ण कोरोनावरील उपचार घेत आहेत. समाधानकारक बाब म्हणजे आतापर्य़ंत ९,८८,०३० रुग्णांनी कोरोनावर मात केलेली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button