Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: चिंताजनक! सात दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटींवर पोहोचणार?- WHO

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण वेगानं पसरताना दिसत आहे. 180 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. येत्या 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटींवर पोहोचणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली आहे.

या आकडेवारीबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेडरॉस अधनॉम म्हणाले की, पुढच्या आठवड्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या एक कोटींवर पोहोचू शकते. हे संपूर्ण जगासाठी रिमांइड करण्याची बाब आहे. कोरोनाची लस आणि औषधे यावर संशोधन चालू आहे. लस कधी येणार याबाबत अद्याप काही सांगता येत नाही मात्र हा वेगानं पसरणारा संसर्ग कसा रोखता येईल आणि शक्य तेवढ्या लोकांचे जीव कसे वाचवता येतील यावर विचार करणं गरजेचं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button