Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: गुजरातमध्ये काँग्रेस नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू
गुजरातमध्ये करोनाचा संसर्ग झाल्यानं काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. १५ एप्रिल रोजी त्यांची चाचणी करण्यात आल्यानंतर करोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर त्यांना अहमदाबादमध्ये महापालिकेच्या एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला.अहमदाबाद महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते बद्रुद्दीन शेख हे करोनाचा शिरकाव झाल्यापासून विविध माध्यमातून मदत करण्याच काम करत होते. त्याच दरम्यान त्यांना करोनाचा संसर्ग झाला.





