बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, ३५ आमदारांनी घेतली शपथ, कुठला शपथविधी ठरला लक्षवेधी?

Bengal the suvendu adhikari government expands : पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं सरकार आलं आहे. त्यानंतर तीन आठवड्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडाळाचा विस्तार करण्यात आला आहे. ३५ आमदारांनी आज शपथ घेतली आहे. सोमवारी हा एका खास सोहळ्यात ३५ आमदारांचा शपथविधी पार पडला. यामध्ये १३ कॅबिनेट मंत्री, १९ राज्य मंत्री आणि ३ स्वतंत्र प्रभार मंत्री आहेत. कॅबिनेटचा विस्तार केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात ४१ मंत्री झाले आहेत. आपण जाणून घेऊ या मंत्रिमंडळाबाबत.
कुणी कुणी घेतली शपथ?
अर्जुन सिंह, तापस रॉय, शरदवत मुखर्जी, जगन्नाथ चट्टोपाध्याय, शंकर घोषण या मंत्र्यांनी शपथ घेतली. पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यात दीपक बर्मन, मनोज उरांव, गौरी शंकर घोष, स्वपन दासगुप्ता, दुध कुमार मंडल यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाच्या नेतृत्वाने म्हटलं आहे की विस्तारीत मंत्रिमंडळात विविध सामाजिक वर्गांना आणि स्थानिकांना संधी देण्याचा आम्ही आमच्या परिने प्रयत्न केला आहे. पहिल्या टप्प्यात शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये महिला, मतुआ आणि राजवंशी तसंच आदिवासी समुदायाच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आलं. औसग्रामच्या आमदार कलिता माजी यांनी गृहसेविका म्हणूनही काम केलं होतं. त्यांना राज्य मंत्री म्हणून शपथ देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये कॅबिनेट विस्तार करुन भाजपा सरकारने विविध विभाग वाटपांमध्ये विविध प्रकारच्या लोकांना जबाबदारी दिली आहे. सरकारने निवडणुकीच्या आधी जी आश्वासनं दिली होती त्या योजना आता कार्यान्वित होतील अशी अपेक्षा आता सगळ्यांनाच आहे.
पश्चिम बंगालचे कॅबिनेट मंत्री कोण आहेत?
दीपक बर्मन
तपस रॉय
डॉ. शंकर घोष
मनोज कुमार उरांव
अर्जुन सिंह
स्वपन दासगुप्ता
जगन्नाथ चॅटर्जी
कल्याण चक्रवर्ती
अजय पोद्दार
शाश्वत मुखर्जी
दूधकुमार मंडल
अनुप कुमार दास
राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार कोण आहेत?
डॉ. इंद्रनील खान
मालती रावा रॉय
राजेश महतो
हेही वाचा – लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र? मंत्री आदिती तटकरेंनी अखेर मौन सोडले, सांगितले नेमके कारण!
राज्य मंत्री कोण कोण झालं आहे?
ज्वेल मुर्मू
हरे कृष्ण बेरा
आनंदमय बर्मन
अशोक डिंडा
नदियार चंद बाउरी
विशाल लामा
शांतनु प्रामाणिक
मौमिता बिस्वास मिश्रा
उमेश रॉय
पूर्णिमा चक्रवर्ती
कौशिक चौधरी
भास्कर भट्टाचार्य
दिवाकर घरामी
अमिया किस्कू
कलिता माझी
गर्गी दास घोष
बिराज बिस्वास
दीपांकर जना
सुमना सरकार
सुवेंदू अधिकारी यांनी शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या बरोबरीने महागाई भत्ता देण्याबाबत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार योग्य रक्कम देण्याबाबत चर्चा करण्यात आली. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने २०७ जागा मिळवत मोठा विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी अटीतटीची लढत झाली. भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांची लढत लक्षवेधी ठरली. अवघ्या देशाचं लक्ष या जागेवर होतं. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, ममता बॅनर्जींचा दारुण पराभव झाला. भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी १५ हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला.
या शपथविधी सोहळ्यात कलिता माजी यांचा शपथविधी हा सर्वात लक्षवेधी ठरला. याचं कारणही तसंच होतं. कलिता माजी या निवडणुकांपूर्वी गृहसेविका म्हणून काम करत होत्या. भाजपाने त्यांना तिकिट दिलं आणि ओसग्राम मधून त्या निवडून आल्या. राजकारणात येण्यापूर्वी त्या घरोघरी गृहसेविकेचं काम करत होत्या. त्यांना राज्यमंत्रिपद देऊन भाजपाने आम्ही सामान्यांसाठी किती बांधील आहोत हा संदेशच पश्चिम बंगालच्या जनतेला एका अर्थाने दिला आहे. त्यामुळे हा शपथविधी सर्वात लक्षवेधी ठरला.
सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालमधील नंदीग्रामचे आमदार आहेत, तसंच ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले आहेत. एक तळागाळातील नेते म्हणून त्यांनी एकेकाळी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याला तृणमूल काँग्रेसचा (TMC) बालेकिल्ला बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. ५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी यांना एक प्रतिष्ठीत राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असून त्यांचा पूर्व पूर्व मेदिनीपूरमध्ये मोठा प्रभाव आहे. या प्रभावामुळेच अधिकारी कुटुंबाला या भागात “राजकीय सम्राट” म्हणून ओळखले जाते. अधिकारी कुटुंब मुळचं काँग्रेसी होतं. परंतु, ममता बॅनर्जी यांनी १९९८ मध्ये तृणमूल काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अधिकारी कुटुंब या पक्षात सामिल झाले. सुवेंदू यांचे वडील शिशिर अधिकारी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए-२ सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिले आहे. शिशिर यांना इतर तीन मुले असून सुवेंदू, दिब्येंदू आणि सर्वात धाकटा सौमेंदू हे तिघेही राजकारणात आहेत.
एकेकाळी ममता बॅनर्जींचे उजवे हात मानले जाणारे सुवेंदू अधिकारी २०२० च्या अखेरीस त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनले. तृणमूल सोडण्यापूर्वी ते पक्षात अत्यंत शक्तिशाली नेते होते. मात्र, ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची पक्षात वाढलेली ताकद अधिकारी कुटुंबाला रुचली नाही. पक्षाबद्दलची त्यांची नाराजी त्यांच्या पक्षांतराच्या बराच काळ आधीपासून दिसून येत होती. त्यांनी पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहणे बंद केले होते आणि तृणमूल नेते सौगत रॉय यांनाही त्यांना रोखण्यात अपयश आले. नोव्हेंबर २०२० मध्ये सुवेंदू यांनी परिवहन आणि जलसंपदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आता ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहेत.





