breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

आजपासून झाले मोठे बदल! खिशावर भार पडणार!

Financial Year | आजपासून (१ एप्रिल) नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आहे. या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पैशासंदर्भात अनेक बदल होणार आहेत. या नवीन बदलांमध्ये गुंतवणूक योजना, फास्टॅग, पीएफ यासह अनेक बदल होणार आहेत.

EPFO चा नवीन नियम : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने फंड बॅलेन्ससाठी ऑटोमेटिक ट्रांसफर नियम लागू केला आहे. कर्मचाऱ्याने नोकरी बदलल्यास पीएफ अकाऊंट परस्पर नव्या नोकरीच्या ठिकाणी ट्रान्फर होणार आहे.

SBI क्रेडिट कार्ड : एसबीआयचे क्रेडिट कार्डच्या नियमात बदल झाला असून एसबीआयच्या सर्व क्रेडिट कार्डचे पैसे भरल्यास कार्ड होल्डरला रिवॉर्ड पॉईंट मिळणार आहेत.

हेही वाचा     –      ‘सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरच्या १२ अतिरेक्यांना वाचवलं’; राम सातपुतेंचा गंभीर आरोप 

फास्टॅग नियमात बदल : NHAI नुसार १ एप्रिल २०२४ पासून KYC नसेल तर फास्टॅग काम करणार नाही. त्यामुळे तुम्हाला टोल भरता देखील येणार नाही.

वाहन खरेदी महाग : इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे आजपासून महाग होणार आहे. फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स अंतर्गत उपलब्ध सबसिडी सरकारने बंद केली आहे.

नवीन कर व्यवस्था : सरकारने आजपासून नवीन कर प्रणाली डीफॉल्ट केली आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्हाला जुन्या कर प्रणाली अंतर्गत कर भरायचा असेल तर तुम्हाला तो स्वतः निवडावा लागेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button