ताज्या घडामोडीराष्ट्रिय
या आठवड्यात बँका 4 दिवस बंद राहणार
![Banks will be closed for 4 days this week](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/2015_4image_13_16_142018850bank-ll.jpg)
सणांमुळे या आठवड्यात बँकांना तब्बल चार दिवस सुट्टी देण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, परदेशी बँका, सहकारी बँका आणि भारतातील प्रादेशिक बँकां अशा श्रेणीत RBIने सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
आठवड्यातील सणांची सुट्टी :-
17 मार्च 2022 – ‘होलिका दहन’ निमित्त डेहराडून, कानपूर, लखनौ आणि रांची येथे बँका बंद राहतील.
18 मार्च, 2022 – होळी/धुलेती/दोलयात्रेच्या निमित्ताने अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, लखनौ, कोलकाता, मुंबई, नागपूर, रांची, शिलाँग, जम्मू आणि श्रीनगर येथे बँका बंद राहतील.
19 मार्च 2022 – भुवनेश्वर, पाटणा आणि इंफाळमध्ये होळी/याओसांगच्या निमित्ताने बँका बंद राहतील.