ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

‘औरंग्या फॅन क्लब’ मधील दुतोंडी गांडुळांची गरळ !

नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात जिहादींनी व्यवस्थित नियोजन करून, अचूक वेळ साधून हिंदू-मुस्लीम दंगल घडवून आणली. खरं म्हणजे ती दंगल नव्हतीच! शस्त्रांनी सज्ज असलेल्या मुस्लिमांनी बेसावध हिंदूंवर केलेला तो हल्लाच होता ! त्यात हिंदूंच्या मालमत्तेचे अपरिमित नुकसान झाले, हे महत्त्वाचे !

कणखर मुख्यमंत्री वसुली करणार !

राज्याचे कर्तव्यकठोर आणि कणखर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आता मोठा निर्णय घेतला आहे, त्याबद्दल त्यांचे प्रथम कौतुक ! दंगलीनंतर शंभरावर जिहादींची धरपकड झाली, एफ.आय.आर. दाखल झालेल्यांची संख्या सुद्धा पाऊणशेच्या घरात गेली. आता झालेल्या नुकसानीची भरपाई या जिहादींकडून करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नुकसानीचे पंचनामे करून त्यांना हे पैसे दिले जाणार आहेत. नाहीतर अशा गुन्हेगारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

जे घडले ते वाईटच..

नागपूर मध्ये १९ मार्चच्या रात्री जे घडले, ते अत्यंत निंदनीय आणि वाईटच आहे. जिहादींनी या शांतताप्रिय शहरात अक्षरशः हैदोस घातला, त्यात गैर मुस्लिम म्हणजेच हिंदू-बौद्ध-जैन-शीख जे कोणीही असेल त्याच्या संपत्तीची जाळपोळ केली, त्यांची पूर्णपणे वाट लावली..!

शिल्लक सेनेकडून पोळी भाजणे सुरू..

राजकीय वातावरण पेटलेले असताना आयती पोळी भाजण्याचा नवा धंदा उबाठा गटाच्या शिल्लक सेनेकडून नेहमीच केला जातो. त्यात स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि त्यांची उरली सुरली पिलावळ बिनाधारेच्या शाब्दिक तलवारी बाहेर काढून हवेत वार सुरू करतात, तोच प्रकार यावेळी झाला.

हिरवे पुरोगामित्व झळकू लागले..

या पार्श्वभूमीवर वास्तविक सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून वक्तव्य करायला हवे, पण आपले ‘आलमगीर उध्दव ठाकरे’ यांचे हिरवे पुरोगामित्व झळकायला लागले. स्वतः उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधत ‘भाजप हिंदू मुस्लिम करते’, ‘दोघांमध्ये फाटाफूट पाडते’ अशी टोलेबाजी केली, तर त्यांचे खास संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांच्या मुलांवर तोंडसुख घेतले. यांची मुले कुठे भारतात असतात? ती मुले मात्र दुबईला जाऊन क्रिकेट बघतात, शिक्षणाला, नोकरीला परदेशातच असतात. त्यांना दंगलीचे काय? असे तारे तोडले!

या नतद्रष्टांना विचारधारा बदलण्याचा आजार

आपल्या समाजामध्ये एखाद्याला विसरण्याचा आजार असतो, हे मान्य..पण, या ‘औरंग्या फॅन क्लब’ च्या नेत्यांना विचारधारा बदलण्याचा आजार आहे. हे तथाकथित नेते स्वतःचे किंवा स्वतःच्या पक्षाचे मुस्लिमविरोधी वक्तव्य जाणून बुजून विसरतात, त्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्राने पाहिली आहेत आणि उबग येऊन त्यांना सत्तेपासून कोसो दूर ठेवले आहे.

हेही वाचा –  शिवाजीनगर न्यायालयात ‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेचा प्रत्यय, अपंग शेतमजूर महिलेसाठी न्यायाधीश दोन मजले उतरुन आले खाली

ही त्यांची वक्तव्ये आठवतात का?

अशा नाजूकप्रकरणी त्यांनी काढलेली काही ‘अजरामर’ वक्तव्ये आठवतात का? एक म्हणजे ‘शिवराय होते, म्हणून आपण हिंदू आहोत, नाहीतर रोज नमाज पठण करायला लागले असते.’ ‘बाबरी शिवसेनेने पाडली..’ उद्धव ठाकरे यांनी तर अनेक मुस्लिम विरोधी विधाने केली आहेत. प्रसंग बदलला की यु-टर्न मारायचा आणि हिंदूंना झोडपणारी बेछूट विधाने करायची ही त्यांची आता परंपरा होऊ लागली आहे.

बाळासाहेबांची रोखठोक विधाने..

वंदनीय बाळासाहेब ठाकरे उघडपणे म्हणायचे, की ‘बाबरी पाडणारे आम्हीच’! अजूनही त्यांचे एक वादग्रस्त भाषण वायरल होत असते, ज्यात बाळासाहेब म्हणाले होते, की शपथ घ्यायची तर ही घ्या, जसे ते एकवटले, तसेच आम्ही सुद्धा एक होऊ. लांड्याना टक्कर देऊ..नाहीतर ते देश गिळतील. कुठे ते बाळासाहेब आणि कुठे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिल्लक सेना!

संजय राऊत नुसतेच बोल बच्चन !

उद्धव यांचा ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ आणि रोज सकाळी बोल बच्चनगिरी करणाऱ्या संजय राऊत २०१९ आधी म्हणायचे की ‘मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या’..तेच आज या मुस्लिमांचे तुष्टीकरण करत असून भाजपा आता हिंदू-मुस्लिमांमध्ये आग लावून देशाचे दोन तुकडे करणार ! संजय राऊत यांचे काय झाले आहे, त्यांना भाजपाची कावीळ झाली असल्यामुळे भाजपाला विरोध करता करता ते देशाला विरोध करू लागले आहेत !

काँग्रेसच्या मांडीवर बसताच.. बदलले !

थोडासा इतिहास पाहिला तर २०१९ मध्ये बहुमत मिळाले असताना सुद्धा भाजपला दगा देऊन उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जाऊन ‘धर्मनिरपेक्ष’ बनून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हाचे वक्तव्य आठवते का? ‘यापुढे मी हिंदुत्व नाही तर सेक्युलर विचार धारेवर लढेन.’ त्यानंतर ते फक्त धर्मनिरपेक्ष झाले नाहीत, तर काही काळातच हिंदूविरोधी सुद्धा बनले.

प्रत्येक गोष्ट हिंदूंना दुखावणारी..

एका भाषणात भगवा झेंडा आणि श्रीमत भगवत गीतेचा अपमान करून आणि श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला गैरहजर राहून त्यांनी जे दिवे पाजळले त्याचा फटका आज नाहीतर उद्या त्यांना बसणार होताच. त्याचा परिणाम म्हणून २०२४ ची विधानसभा निवडणूक झाल्यावर दिसला. हिंदूंनी या ‘औरंग्या फॅन क्लब’ च्या हिरव्या सेनेचा सुपडा साफ केल्यावर त्यांचे मेलेले हिंदुत्व पुन्हा जागृत झाले. परत पलटी मारून आता शड्डू मारू लागले की ‘मी हिंदुत्व सोडल्याचा एक तरी पुरावा दाखवा. वा रे वा उद्धव बाळासाहेब ठाकरे !

थोडीशी तुलना बाळासाहेबांशी !

वंदनीय बाळासाहेबांशी थोडीशी तुलना केली तर बाळासाहेब १९९० पासून त्यांच्या उजव्या विचारसरणीवर ठाम होते. भले ते सत्तेत असोत किंवा बाहेर असोत, म्हणूनच त्यांची संघटना कठीण काळात टिकून राहिली. त्या काळात देशभरात वाढत्या ‘हिरव्या दहशती’ ला राजकीय उत्तर देण्यासाठी जातीत पातीत विभागलेल्या सर्व हिंदूंना एकत्र आणून हिंदूचे त्यांनी नेतृत्व केले.
म्हणून तेव्हा ती एक वेळ होती, जेव्हा शिवसेना म्हटले की बाळासाहेबांचा कणखर आवाज आणि त्यांची भाषणे आठवायची.. भगवा फडकताना डोळ्यासमोर दिसायचा.. आठवायचे ते म्हणजे धर्मअभिमानी हिंदू!

नेमकी कोणती विचारधारा?

उद्धव यांची शिल्लक सेना आता नेमक्या कोणत्या विचारधारेवर चालली आहे, हेच समजेनासे झाले आहे. किंबहुना त्यांच्या विचारांना आता दिशाच राहिली नाही. धड हिंदुत्व नाही, धड मुस्लिमांचे लांगुलचालन नाही, धड कम्युनिझम नाही आणि धड कोणताच विचार नाही. रोज त्यांचा एक एक शिलेदार गळतो आहे, आणि तरीही त्यांचे डोळे उघडत नाहीत. असेच चालू राहिले तर कसेबसे निवडून आलेले वीस आमदार तरी शेवटपर्यंत राहणार का? हा खरा प्रश्न आहे. त्यात त्यांना सल्लागार भेटले आहेत, ते शकुनी मामा आणि मंथरा अक्का..याचाच अर्थ विनाश हा ठरलेला! उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सांगायचे झाले तर ‘विपरीत काले विनाश बुध्दी’ अशी त्यांची अवस्था आहे, हे नक्की !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button