कोरेगाव पार्क येथील अंध शाळेत अथर्व पाटीलचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमातून साजरा
शिक्षण विश्व: ग्लोबल फाऊंडेशनच्या पुढाकारातून अन्नदान व खाऊ वाटपाचा भावस्पर्शी कार्यक्रम

पुणे | प्रतिनिधी
डॉ. सुशांत पाटील ग्रुप यांच्या आयोजनाखाली तसेच अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाऊंडेशन, बाणेर, पुणे यांच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथील मुलांची अंध शाळा येथे चि. अथर्व सुशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान व खाऊ वाटपाचा अत्यंत भावस्पर्शी व आनंददायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या सेवाभावी कार्यक्रमास मा. डॉ. सुशांत पाटील यांची अध्यक्षस्थानी प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. मानवी मूल्ये, सेवा, करुणा व सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थित सर्वांच्या मनाला स्पर्श करून गेला.
कार्यक्रमात अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाऊंडेशनचे प्रकल्प संचालक डॉ. श्रीराम चव्हाण यांनी फाऊंडेशनच्या सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्याचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला. यावेळी अंध शाळेचे प्रशासकीय अधिकारी श्री. अमृत एकनाथ लोखंडे यांचा सन्मानपूर्वक परिचय करून देण्यात आला.
हेही वाचा : अॅड. अनुजा पाटील यांचा सेवाभावी उपक्रम; अथर्वाचा वाढदिवस दृष्टिहीन मुलींमध्ये साजरा

कार्यक्रमाची सुरुवात अंध शाळेचे प्राचार्य श्री. मोरे सर व प्रशासकीय अधिकारी श्री. अमृत लोखंडे सर यांच्या हस्ते मा. डॉ. सुशांत पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करून करण्यात आली. त्यानंतर अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीत व देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या सुरेल आवाजाने व मनापासूनच्या सादरीकरणाने उपस्थित पाहुण्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.
विधायक व प्रेरणादायी कार्यक्रम…
यानंतर चि. अथर्व सुशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान, खाऊ व केक वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अंध शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार, खाऊ व केकचे वाटप करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद, उत्साह व हास्य पाहून उपस्थित प्रत्येकाच्या मनात समाधानाची भावना निर्माण झाली. अत्यंत प्रेमळ, आपुलकीच्या व आनंदी वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रशासकीय अधिकारी श्री. अमृत लोखंडे यांनी सर्व मान्यवर, आयोजक, सेवाभावी संस्था व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. सेवा, संवेदना व माणुसकी यांचा सुंदर संगम असलेला हा कार्यक्रम उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.




