Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

विमान प्रवास महागणार! जेट इंधनाच्या दरात तब्बल ११५ टक्के वाढ

Jet Fuel Price Hike | पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता जगभरातील सामान्य जनतेच्या आयुष्यावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. भारतात आधीच एलपीजी गॅसचा तुटवडा आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा फटका बसत असताना, आता विमानांच्या इंधनालाही या परिस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे.

आज (१ एप्रिल) सरकारी तेल कंपन्यांनी एविएशन टर्बाइन फ्यूअल (ATF) च्या नव्या दरांची घोषणा केली असून, एप्रिलच्या सुरुवातीलाच जेट इंधनाच्या दरात तब्बल ११५ टक्के वाढ झाली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच जेट इंधनाची किंमत २ लाख रुपये प्रति किलोलीटर या पातळीवर पोहोचली आहे.

हेही वाचा      :              व्यावसायिक गॅस सिलिंडर १९५ रुपयांनी महागला; आजपासून नवे दर लागू 

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्या माहितीनुसार, दिल्लीत देशांतर्गत विमानांसाठीच्या एटीएफच्या दरात जवळपास ११५ टक्क्यांची वाढ होऊन तो २.०७ लाख रुपये प्रति किलोलीटर इतका झाला आहे. तर मुंबईत एटीएफचा दर १ लाख ९४ हजार रुपये प्रति किलोलीटर इतका नोंदवला गेला आहे.

आंतरराष्ट्रीय उड्डाणेही महाग

आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या किमतीतही मोठी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतून आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी एटीएफच्या दरात १०७ टक्क्यांची वाढ होऊन तो १,६९० डॉलर प्रति किलोलीटर इतका झाला आहे. कोलकातामध्ये हा दर सर्वाधिक वाढून १,७२७.३ डॉलर प्रति किलोलीटर इतका झाला आहे.

एटीएफच्या किमतीत झालेल्या या मोठ्या वाढीमुळे भारतातील विमान कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, विमान भाड्यात वाढ होण्याची शक्यता असून, त्यामुळे प्रवाशांची मागणी घटण्याचा इशाराही हवाई उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button