ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे निलखमध्ये अनधिकृत RMC प्लॅन्टचा कहर!

रविराज काळे यांची टीका: नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

पिंपरी-चिंचवड | पिंपळे निलख परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून, अनधिकृत RMC (रेडी मिक्स कॉंक्रिट) प्लॅन्टमुळे हवा प्रदूषणाची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. आपचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी याबाबत गंभीर आरोप करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

CNG पंपच्या मागील बाजूस कार्यरत असलेल्या Greystone Infra आणि Carnival Infra या दोन RMC प्लॅन्टमधून मोठ्या प्रमाणावर धूर आणि धूळ निर्माण होत असून, संपूर्ण परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरल्यामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनासंबंधी आजारांचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, या परिसरात अकॅडमी, Kalmadi School चे खेळाचे मैदान, गार्डन तसेच अनेक निवासी सोसायट्या आणि CNG पंप असल्याने येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. लहान मुले खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक व्यायामासाठी येत असल्याने आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

हेही वाचा       :              पवना नदी प्रदूषण करणाऱ्यांवर तात्काळ करावई करा! 

या अनधिकृत प्लॅन्टबाबत Pimpri Chinchwad Municipal Corporation च्या पर्यावरण विभागाला लेखी तक्रार देण्यात आली होती. विभागाने संबंधित प्लॅन्टला सील देखील केले होते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे प्लॅन्ट चालकाने सील तोडून पुन्हा कामकाज सुरू केले. तरीही Pimpri Chinchwad Municipal Corporation प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, Maharashtra Pollution Control Board ने या प्रकरणाची दखल घेत महावितरण विभागाला वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश दिल्याचे समोर आले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.

पिंपळे निलखमधील अनधिकृत RMC प्लॅन्टमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. प्रशासनाने सील केलेला प्लॅन्ट पुन्हा सुरू होणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. Pimpri Chinchwad Municipal Corporation ने तात्काळ कठोर कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.

– रविराज काळे, शहराध्यक्ष, आप.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button