डॉ. स्मिता पाटसकर यांना दुबईत बेस्ट पेपर अवॉर्ड

पिंपरी | दुबई येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी येथील सिव्हिल अभियांत्रिकी विभागातील डॉ. स्मिता पाटसकर यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या संशोधन निबंधास ‘बेस्ट पेपर अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
“महामारीच्या काळात मेट्रो रेल्वे बांधकाम कार्यक्षेत्राजवळील वाहतूक वर्तन नमुन्यातील बदल” या विषयावरील त्यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष दाद मिळाली.
हेही वाचा : विमान प्रवास महागणार! जेट इंधनाच्या दरात तब्बल ११५ टक्के वाढ
या परिषदेत विभागामार्फत एकूण सहा संशोधन निबंध सादर करण्यात आले. डॉ. स्मिता पाटसकर यांच्यासह डॉ. कुंदन काळे, अंशुल अग्रवाल, तुषार शिंगाणे आणि संकेत भैरात यांनी सहभाग नोंदवला.
संस्थेचे चेअरमन सतेज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, संचालक रियर अॅडमिरल अमित विक्रम (नि.), प्राचार्या डॉ. पी. मालती तसेच विभागप्रमुख डॉ. अशोक मोरे यांनी डॉ. स्मिता पाटसकर यांचे अभिनंदन केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





