Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

कोलंबिया हादरला! हवाई दलाचे C-130 विमान कोसळले, ६६ ठार

Colombia Military Plane Crash | दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात सोमवारी भीषण विमान अपघात झाला असून या दुर्घटनेत किमान ६६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हवाई दलाचे हर्क्युलस सी-१३० हे लष्करी विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली.

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था एसोसिएटेड प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात एकूण १२१ जण प्रवास करत होते. त्यामध्ये ११० सैनिक आणि ११ क्रू सदस्य होते. मृत आणि जखमींमध्ये जवानांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जात आहे.

ही दुर्घटना पुटुमायो ॲमेझॉन प्रांतातील इक्वेडोर आणि पेरूच्या सीमेवरील प्युएर्तो लेगुइझामो येथे घडली. स्थानिक उपमहापौर कार्लोस यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हवाई दलाचे विमान उड्डाणानंतर थोड्याच वेळात कोसळले.” अपघातानंतर परिसरातील नागरिक आणि आपत्कालीन पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

हेही वाचा     :              ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करणे स्वीकारार्ह नाही’; लोकसभेत पंतप्रधान मोदींची भूमिका

अपघातानंतर विमान ज्या ठिकाणी कोसळले, त्या परिसरात सुकलेल्या गवतामुळे मोठी आग लागली होती. अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहेत.

संरक्षण मंत्री पेद्रो सांचेज यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट करत सांगितले की, “सैनिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना ही दुर्घटना घडली.” दरम्यान, अपघातग्रस्त हर्क्युलस सी-१३० विमान अमेरिकेकडून २०२० मध्ये दान करण्यात आले होते. तीन वर्षांपूर्वीच त्याची संपूर्ण सुरक्षा तपासणी करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button