ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Positive News: बेपत्ता आकाशचा १८ दिवसांनंतर अखेर सुखरूप शोध

भाजपा युवा मोर्चा मंडलाध्यक्ष विवेक बारोट यांच्या पुढाकारामुळे कुटुंबाशी पुनर्भेट

पिंपरी-चिंचवड | ठाणे येथून बेपत्ता झालेल्या ‘आकाश’ या मुलाचा तब्बल १८ दिवसांनंतर सुखरूप शोध लागून त्याची कुटुंबाशी पुनर्भेट झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात विवेक दीपक बारोट यांच्या तत्परतेने आणि सामाजिक बांधिलकीतून केलेल्या प्रयत्नांमुळे या घटनेचा सुखांत झाला आहे.

आकाश हा मुलगा २ मार्च रोजी ठाणे येथून बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र अनेक दिवस त्याचा काहीही ठावठिकाणा लागत नव्हता. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील मोहननगर परिसरात रात्रीच्या सुमारास भटकताना तो विवेक बारोट आणि त्यांच्या टीमच्या नजरेस पडला.

आकाशला बोलता येत नसल्यामुळे त्याची ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते. मात्र वेळ न दवडता विवेक बारोट यांनी पोलिसांच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे ‘स्पेशल चाइल्ड केअर होम’मध्ये दाखल केले.

यानंतर त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आकाशचे फोटो व व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि अनेकांकडून प्रतिसाद येऊ लागले. अखेर १८ मार्च रोजी एका व्यक्तीने संपर्क साधून स्वतःला आकाशचा भाऊ असल्याचे सांगितले. आवश्यक कागदपत्रे व पोलीस तक्रारीद्वारे त्याची ओळख निश्चित करण्यात आली.

हेही वाचा     :              कोलंबिया हादरला! हवाई दलाचे C-130 विमान कोसळले, ६६ ठार

ओळख पटताच आकाशचे कुटुंबीय तातडीने ठाण्याहून पुण्याकडे रवाना झाले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विवेक बारोट आणि त्यांच्या टीमने आकाशला सुखरूप कुटुंबाच्या स्वाधीन केले. १८ दिवसांनंतर मुलाला पाहून पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.

या घटनेविषयी बोलताना विवेक बारोट म्हणाले की, “रस्त्यावर एक तरुण मुलगा हरवलेला दिसताच आम्हाला काळजी वाटली. तो बोलू शकत नसल्याने अडचणी होत्या, पण सोशल मीडियाच्या मदतीने आणि टीमच्या प्रयत्नांनी आम्ही त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचलो. तो सुखरूप घरी परतला, याचा आम्हाला आनंद आहे.” या संपूर्ण मोहिमेत त्यांच्या टीमनेही मोलाचे सहकार्य केले. विवेक बारोट यांच्या या सामाजिक कार्याचे परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, त्यांच्या पुढाकारामुळे एका कुटुंबाला पुन्हा आपला हरवलेला मुलगा मिळाला आहे.

एक तरुण मुलगा रस्ता चुकल्याचे पाहून आम्हाला काळजी वाटली. तो बोलू शकत नसल्याने आव्हाने होती, पण सोशल मीडियाच्या ताकदीमुळे आणि आमच्या टीमच्या प्रयत्नांमुळे आम्ही त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकलो. आकाश सुखरूप घरी परतल्याचा आम्हाला मोठा आनंद आहे.

– विवेक बारोट, अध्यक्ष, भाजयुमो मंडळ.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button