डीजीपी कार्यालयातील कथित अश्लील कृत्यांची क्लिप व्हायरल; के. रामचंद्र राव यांचं निलंबन!

DGP Ramachandra Rao | कर्नाटकात एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली असून, राज्य सरकारने तातडीची कारवाई करत पोलीस महासंचालक (नागरिक हक्क अंमलबजावणी) के. रामचंद्र राव यांना निलंबित केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या नावाशी संबंधित कथित अश्लील कृत्यांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
व्हायरल झालेल्या क्लिप्समध्ये रामचंद्र राव वेगवेगळ्या महिलांसोबत आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. सोमवारी या क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर प्रशासन आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत राज्य सरकारने तात्काळ निलंबनाची कारवाई केली.
हेही वाचा : विदेशी गुंतवणूकीसाठी ‘महाराष्ट्र’ भारताचा गेट वे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या घटनेनंतर विरोधी पक्षांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर टीकेची झोड उठवली असून, प्रशासनातील शिस्त आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली आहे. त्यांनी सखोल चौकशीचे आदेश देत कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. “आज सकाळीच मला या प्रकरणाची माहिती मिळाली. संबंधित अधिकारी कोणत्याही पदावर असला तरी तो कायद्यापेक्षा मोठा नाही. या प्रकरणाचा सविस्तर तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल,” असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे.




