Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

3 मेनंतर सुद्धा रेल्वेसेवा सुरू होण्याची शक्यता कमी

नवी दिल्ली | देशात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे. 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दरम्यान लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा देशातील ट्रेनची आणि हवाई वाहतूक सुरू होण्याची शक्यता कमी आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रृप ऑफ मिनिस्टर्सच्या बैठकीत अशी माहिती देण्यात आली की, याविषयी आरोग्य मंत्रालयाकडून माहिती घेतल्यानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

जीओएम प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्याच्या पक्षात नाही आहेत. रेल्वे सुरू झाल्यास सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडले जाण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे केंद्राकडून एअक इंडिया तसंच अतर एअरलाइन्सने सुद्धा 3 मेनंतर जर बुकिंग सुरू केले असल्यास ते रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेच.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार ट्रेन किंवा विमान सेवा पूर्ववत करण्याबाबत आता कोणताही निर्णय घेण्याचा विचार करत नाही आहे, या विषयावर चर्चा करणे व्यर्थ आहे. सरकारने विमान किंवा ट्रेनसेवा सुरू करण्यासाठी कोणती तारीख ठरवली आहे का, असा प्रश्न विचारला असता जावडेकरांनी असे उत्तर दिले की- ‘एक ना एक दिवस या सेवा सुरू कराव्याच लागतील पण कधी ते नाही सांगू शकत. याबाबत चर्चा करणं व्यर्थ आहे कारण आपण जगाची स्थिती पाहतो आहोत आणि त्यातून धडा देखील घेत आहोत.’

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button