आजचे राशिभविष्य : 18 वर्षांनंतर राहु-शुक्रची अद्भूत युती
दोघांची युती 3 राशीच्या लोकांना फायदेशीर

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा केव्हा ग्रहांची युती होते तेव्हा त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव होतो. ज्योतिषीय गणनेनुसार, शुक्रने 29 जानेवारीला मीन राशीत प्रवेश केला होता, जिथे राहु आधीच विराजमान होता. त्यामुळे मीन राशीत शुक्र आणि राहु या दोघांची युती होत आहे. जवळपास 2 दशकानंतर या युतीचा योग आला आहे. तब्बल 18 वर्षांनंतर राहु आणि शुक्रची अशी युती होत आहे. या युतीचा थेट परिणाम राशींवर होणार आहे. काही राशींच्या लोकांना या युतीचा फायदा होणार आहे. एकूण 3 राशींना फायदा होणार आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊयात.
मिथुन रास
राहू आणि शुक्रच्या युतीमुळे मिथुन राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसाय आणि नोकरीत आनंदाची बातमी मिळेल. नोकरदार वर्गाला प्रमोशन मिळू शकतं. तसेच मिथुन राशीच्या लोकांचे इनकम सोर्स वाढतील.अचानक नशीब फळफळू शकतं. या काळात नोकरी आणि व्यवसायातील प्रलंबित कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत रोमँटिक ट्रिपवर जाऊ शकता. संपत्तीत वाढ होईल.
हेही वाचा : कर्जाचा EMI कमी होणार! RBI कडून रेपोदरात कपात
कर्क रास
राहू आणि शुक्रच्या युती कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. कर्क रास असलेल्यांना नशिबाची साथ मिळेल. या दरम्यान सर्व लक्ष्य पूर्ण होतील. नोकरदार वर्ग नव्या शिखराला गवसणी घालू शकतील. करियरमध्ये चांगली कामगिरी दिसून येईल. विवाहितांचं नातं आणखी दृढ होईल. आर्थिक स्थिती आधीपेक्षा आणखी चांगली होईल. व्यवसायात आर्थिक लाभाची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.
मीन रास
राहू आणि शुक्राची युती मीन राशीसाठी शुभ समजली जात आहे. कुटुंबियांसह चांगला वेळ घालवता येईल. व्यवसायासंदर्भात विदेश दौरा करावा लागू शकतो. धार्मिक कार्यात रस वाढेल. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. अनपेक्षितपणे पैसे मिळू शकतात. विवाहितांना चांगली बातमी मिळू शकते.