२०२० पेक्षा २०२१ वर्ष अधिक भयंकर असणार, बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
![The year 2021 will be more terrible than 2020, predicts Baba Venga](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/बाबा-वेंगा.jpeg)
मुंबई – २०२० हे वर्ष सर्वांसाठीच वाईट गेले. या वर्षांत अनेकांनी आपली माणसे गमावली, तर अनेकांचा रोजगार कायमचा निघून गेला. त्यामुळे या २०२० च्या शेवटच्या दिवसांत २०२१ हे वर्ष चांगलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, जगप्रसिद्ध भविष्यकार बाबा वेगां यांच्या भविष्यवाणीनुसार २०२१ हे वर्ष २०२० पेक्षाही भयंकर असणार आहे.
२०२१ हे वर्ष २०२० पेक्षाही अधिक वाईट ठरेल अशी भविष्यवाणी बाल्कानची नॉस्रेदमस अशी ओळख असलेल्या बाबा वेंगा यांनी केली आहे. बाबा वेंगा यांनी 5079 पर्यंतच्या भविष्यवाणी लिहून ठेवल्या आहेत. बाबा वेंगा यांनी केलेल्या 85 टक्के भविष्यवाणी आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. अमेरिकेवरील 9/11 चा हल्ला, ब्रेक्झिटसह जगभरातील अनेक घटनांबाबत बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणी अचूक ठरल्याचा दावा केला जातो.
यंदाचं वर्ष जभरातील लोकांना फारसं चांगलं गेलेलं नाही. यंदा कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग व्हेंटिलेटरवर आहे. आपण कितीही ठरवलं तरी 2020 च्या कटू आठवणी विसरू शकणार नाही. त्यामुळे अनेकांनी 2020 हे सर्वात वाईट वर्ष होतं असं जाहीरच केलं आहे. त्यामुळे अनेक जण हे 2020 वर्ष कधी संपणार याची वाट पाहात आहेत. पुढील वर्ष अजून चांगलं असेल अशी लोकांची 2021 कडून अपेक्षा आहे. परंतु बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीने लोकांची डोकेदुखी वाढवली आहे.
2021 बाबत बाबा वेंगा यांनी सांगितलं आहे की, जगात अनेक प्रलय आणि आपत्ती येतील. एक मोठा ड्रॅगन माणसावर ताबा मिळवेल. भविष्यवाणी आणि गूढ भाषांमधील तज्ज्ञांच्या मते बाबा वेंगाचा इशारा चीनच्या दिशेने होता. चीन अमेरिकेला नमवत जगातील सर्वात शक्तीशाली देश बनेल. भारतही अधिक बलवान होणार आहे. युरोपात रासायनिक हल्ले होतील. तसेच इंधनावरूनही भांडणं होतील. पेट्रोलियमचं उत्पादन थांबू शकतं.
बाबा वेंगा यांनी सोव्हिएत युनियनचे विभाजन, अमेरिकेवरील 9/11 चा दहशतवादी हल्ला, प्रिन्सेंस डायनाचा मृत्यू, चेर्नोबिल दुर्घटना, अमेरिकेला मिळालेले पहिले आफ्रिकन राष्ट्राध्यक्ष, यांसह अनेक भविष्यवाणी केल्या होत्या, ज्या खऱ्या ठरल्या होत्या. वेंगा यांनी अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लॅदिमीर पुतीन यांच्याबाबतही भविष्यवाणी केली होती. ट्रम्पना गूढ आजार होईल तर पुतीन यांच्यावर त्यांच्याच देशातील काही समाजकंटक हल्ला करतील, असंही सांगितलं होतं.