Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
सांगलीत राष्ट्रवादीचे जिल्हा शहर उपाध्यक्ष पाटोळे यांचा खून
सांगली । राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा व शहर उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव पाटोळे यांचा अज्ञातांनी निर्घृण खून केला. कुपवाड एमआयडीसीतील रोहिणी कोल्डमध्ये आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खुनानंतर हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच तपासासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.
दरम्यान, कुपवाडमध्ये पाटोळे यांचा खून झाल्याची माहिती मिळताच नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मिरज उपविभागाचे पोलीस अधिकारी संदीपसिंह गिल, सहाय्यक निरीक्षक निरज उबाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. दोन ते तीन हल्लेखोरांनी खून केल्याची चर्चा परिसरात होती.





