‘आपण जाती विसरू तेव्हा मोठे होऊ’; अभिनेते नाना पाटेकर

Nana Patekar | आपण जाती विसरू तेव्हा मोठे होऊ. काम करताना आपला चेहरा महत्त्वाचा नसतो, आपण काय करतो हे महत्त्वाचे. मेंदूत ताकद हवी, विचारधारा महत्त्वाची असते असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. इस्लामपूर येथे आयबीएफच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या व्यावसायिक प्रदर्शनाचे उद्घाटन पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अभिनेते नाना पाटेकर म्हणाले, की तुमची प्रज्ञा, ताकद, वैचारिकता यावर तुमचे मोठेपण अवलंबून आहे. आपला वकुब आपली पात्रता ठरवतो. मला आजवर कुणी जात विचारली नाही. संतांनी ब्राह्मणांची मिरासदारी मोडून काढली. आपण जाती विसरू तेव्हा मोठे होऊ. काम करताना आपला चेहरा महत्त्वाचा नसतो, आपण काय करतो हे महत्त्वाचे. मेंदूत ताकद हवी, विचारधारा महत्त्वाची असते.
जयंत पाटील यांनी नियतीने लादलेले राजकारण यशस्वी करून दाखवले आहे. कोणाला त्रास न देता आनंद मिळवणे हे छान आहे. ‘नाम’ फाउंडेशनमध्ये अनेकजण सोबत येत आहेत. यावेळी एक हजार गावांमध्ये काम सुरू करत आहोत. पूर्वी दुष्काळी भाग असणारे गाव यावेळी बागायती घोषित झाल्याचा आनंद होतोय. खरं बोललं की लक्षात ठेवावं लागत नाही मात्र, खरं बोलण्याचे परिणाम भोगण्याची तयारी ठेवायची, असंही नाना पाटेकर म्हणाले.