ताज्या घडामोडी
शिवाजी घोडे यांना बॅंकॉकमध्ये डायनामिक जर्नालिस्ट पुरस्कार प्रदान
पिंपरी (Pclive7.com):- ग्लोबल रीसर्च कॉन्फरन्स
फोरम चिंचवड आणि बॅंकॉक येथील फरानाखोन राजाभट युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने बॅंकॉक येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पत्रकार शिवाजी घोडे यांना डायनामिक जर्नालिस्ट ॲवार्ड देवून गौरविण्यात आले.
यावेळी थायलंडच्या पंतप्रधानांचे सल्लागार पिचाइ नरिप्थाफन, फरानाखोन राजाभट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रियांग कित्रातपोर्न, अरूणाचल प्रदेश मधील हिमालया विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. प्रकाश दिवाकरन, फरानाखोन विद्यापीठाचे डॉ. अरुण चायनीत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सस्टेनेबल बिझनेस ग्रोथ, चॅलेंजेस, मेझर्स ॲंड सोल्यूशन्स इन ग्लोबल सिनेरिओ या विषयीच्या परिषदेत जगभरातील १३५ प्रतिनिधी सहभागी झाले होते.
श्री.घोडे हे गेली २३ वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी सकाळ, पुढारी, पवना समाचार अशा वृत्तपत्रात पत्रकारिता केली. सध्या शक्ती न्यूज पोर्टल आणि धनश्री दिवाळी अंकाचे ते संपादक म्हणून कार्यरत आहे.याचबरोबर शब्द पब्लिसिटीच्या माध्यमातून गेली २० वर्षांपासून मीडियाची सेवा देत आहे.त्यांनी मी खानदानी पोरगी हाय या व्हिडिओ अल्बम नंतर “जावाई जोमात- सासरे कोमात” या नाटकाच्या माध्यमातून नाट्य दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे.