सांगवीतील उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण कामाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन

जुनी सांगवी : सांगवी फाटा महात्मा जोतिबा फुले उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या भौगोलिक आणि नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी हा अत्यंत लोकोपयोगी प्रकल्प असेल. या प्रकल्पामध्ये नागरिकांना ओपन जिम, क्लाइंबिंग वॉल, टेबल टेनिस, दुचाकी व चारचाकी वाहनतळ, बास्केट बॉल कोर्ट, क्रिकेट नेट, स्वच्छतागृह, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, रिक्षा स्थानक, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आदी सुविधा उभारण्यात येणार आहेत. नागरिकांच्या आशीर्वादाने आणि साथीने शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू असा विश्वास आमदार शंकर जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा – ‘महारेरा’चा दणका! पुण्यातील ४८७ गृहप्रकल्पांना स्थगिती
समारंभास माजी महापौर उषा ढोरे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भंडलकर, संजय मराठे, शोभा जांभूळकर, गणेश बँकचे संचालक अप्पा ठाकर, डॉ. देविदास शेलार, मनीष कुलकर्णी, गणेश ढोरे, संदीप दरेकर, नवनाथ जांभूळकर, अशोक कवडे, राजू पवार, भाऊसाहेब कानकात्रे, युवराज ढोरे, हिरेन सोनवणे, अशोक ढोरे, बापू ढोरे, संजय जगताप, तानाजी जवळकर, पालिकेचे स्थापत्य मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप अभियंता सुनील पवार, अभिजित दाट, गुरुश मुठे आदी उपस्थित होते.





