breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

विमान प्रवासासाठी पुढील तीन महिने किमान आणि कमाल तिकीट दर निश्चित, केंद्राची घोषणा

देशांतर्गत विमान प्रवासासाठी पुढचे तीन महिने किमान आणि कमाल तिकिट दर निश्चित करण्यात आल्याची घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. विमान प्रवासासाठी लागणारा वेळ यावरुन तिकिट दर निश्चित करण्यात आले आहेत. कमीत कमी तिकिट दर हे ३ हजार ५०० आणि जास्तीत जास्त तिकिट दर हे १० हजार रुपये असे असतील असंही पुरी यांनी स्पष्ट केलं. २४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हे दर निश्चित असतील असंही पुरी यांनी सांगितलं. देशांतर्गत विमान प्रवासासाठी ही दरनिश्चिती करण्यात आली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विमान प्रवासाच्या अंतराचे सात प्रकार

विमानाने ४० मिनिटांपेक्षा कमी वेळ लागणारी ठिकाणं

विमानाने ४० ते ६० मिनिटं लागणारी ठिकाणं

विमानाने ६० ते ९० मिनिटं लागणारी ठिकाणं

विमानाने ९० ते १२० मिनिटं लागणारी ठिकाणं

विमानाने १२० ते १५० मिनिटं लागणारी ठिकाणं

विमानाने १५० ते १८० मिनिटं लागणारी ठिकाणं

विमानाने १८० ते २१० मिनिटं लागणारी ठिकाणं

देशांतर्गत विमान प्रवासासाठी कमीत कमी तिकिट दर हा ३ हजार ५०० रुपये तर जास्तीत जास्त दर हा १० हजार रुपये इतका असणार आहे असंही पुरी यांनी सांगितलं.

आज रात्री ११.५९ पासून २४ ऑगस्टपर्यंत हे निर्णय असतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. केबिन क्रू अर्थात विमानात असणारे कर्मचारी हे सुरक्षित पोशाखात असतील. त्याचप्रमाणे एका प्रवाशाला एकच चेक इन बॅग प्रवासात नेता येईल. विमान ज्या वेळेला सुटणार आहे त्याच्या दोन तास आधी प्रवाशांनी विमानतळावर येणं बंधनकारक असणार आहे असंही हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं.

जे प्रवासी प्रवास करणार आहेत त्यांनी फेस मास्क लावणं बंधनकारक आहे. तसंच सॅनिटायझरची बाटलीही सोबत बाळगणं आवश्यक आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचं जेवण दिलं जाणार नाही. सीटजवळच्या गॅलरी एरिआत पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करुन दिल्या जातील असंही हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button