Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

रेल्वेच्या टीसी, स्टेशन मास्तर, लोको पायलटचा रात्रपाळी भत्ता बंद

नवी दिल्ली – रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रात्रपाळी भत्त्याला आता रेल्वे मंडळाने सिलिंगची कात्री लावली आहे. ४३,६०० रुपये आणि त्यापेक्षा कमी मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांनाच यापुढे रात्रपाळी भत्ता दिला जाणार आहे, असे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तिकीट तपासणीस, लोको पायलट, गार्ड, स्टेशन मास्तर आदींना आता रात्रपाळी भत्ता मिळणार नाही.

रेल्वेतील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आजवर रात्रपाळी भत्ता दिला जात होता. त्यासाठी पगाराची मर्यादा नव्हती. परंतु आता रेल्वे मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार रात्रपाळी भत्त्यासाठी सिलिंग लावले आहे. त्यात ४३,६०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच यापुढे रात्रपाळी भत्ता मिळणार आहे. त्यामुळे त्यापेक्षा जास्त मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना रात्रपाळी भत्ता मिळणार नाही. म्हणून रेल्वे बोर्डाच्या या निर्णयाला रेल्वे संघटना विरोध करणार आहेत, अशी माहिती रेल्वे कर्मचारी संघटनेचे नेते आर. के. पांडे यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button