breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

रिमोर्टशिवाय स्मार्ट फोनद्वारे स्मार्ट टीव्ही कंट्रोल करता येणार…

रिमोर्टशिवाय आता स्मार्ट टीव्हीही कंट्रोल करता येणार आहे… विविध कंपन्याचे भन्नाट फीचर्स असलेल्या स्मार्ट टीव्ही घेण्याकडे लोकांचा अधिक कल असतो.मात्र आता स्मार्टफोनच्या मदतीने स्मार्ट टीव्ही कंट्रोल करता येतो. यासाठी फोनमध्ये IR Blaster असणं गरजेचं आहे. हा एक प्रकारचा सेन्सर असून तो इन्फ्रारेड किरणांच्या मदतीने रिमोट डिव्हाईस कंट्रोल करतो. शाओमी आणि हुवावेसारख्या अनेक स्मार्टफोनमध्ये IR Blaster ची सुविधा ही युजर्सना देण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने टीव्ही, एसी, फॅनसारख्या रिमोटवर चालणाऱ्या वस्तूंवर फोनच्या मदतीने कंट्रोल करता येतं.

स्मार्टफोनमध्ये IR Blaster असल्यास TV Remote Control अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्ट टीव्ही आणि रिमोटवर चालणारी अन्य उपकरणंही कंट्रोल करता येतात…

Android युजर्स

  • गुगलच्या प्ले स्टोरवरून TV Remote Control हे अ‍ॅप डाऊनलोड करा.
  • अँड्राईड फोन आणि स्मार्ट टीव्ही हा एकाच वाय-फाय नेटवर्कने कनेक्ट करा.
  • स्मार्टफोनमध्ये अ‍ॅप ओपन करा आणि स्मार्ट टीव्हीच्या नावावर टॅप करा.

किंवा

  • स्मार्ट टीव्हीच्या स्क्रीनवर एक पिन दिसेल.
  • फोनमध्ये तो पिन नंबर टाकून दोन्ही डिव्हाईस कनेक्ट करता येतो…

iOS युजर्स

  • अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरून TV Remote Control अ‍ॅप डाऊनलोड करा.
  • फोन आणि स्मार्ट टीव्ही हा एकाच वाय-फाय नेटवर्कने कनेक्ट करा.
  • फोनमध्ये अ‍ॅप ओपन करा आणि स्मार्ट टीव्हीच्या नावावर टॅप करा.

किंवा

  • स्मार्ट टीव्हीच्या स्क्रीनवर एक पिन दिसेल.
  • फोनमध्ये तो पिन नंबर टाकून दोन्ही डिव्हाईस कनेक्ट करा.

स्मार्टफोनला रिमोट करण्यासाठी AnyMote, ASmart, IR Universal आणि Peel Smart यांसारख्या अ‍ॅपचाही वापर करता येऊ शकतो. त्यामुळे आपण रिमोर्टशिवायही टिव्ही सुरु करु शकणार आहोत…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button