Breaking-newsताज्या घडामोडी
राहुल गांधींना निर्मला सीतारमण यांचं सडेतोड उत्तर
नवी दिल्ली | मेहूल चोकसी, विजय मल्ल्यासोबतच इतर ५० थकबाकीदारांचे जवळपास सुमारे ६८,६०७ कोटी रुपये माफ केले असा गंभीर आरोप काँग्रेस्या राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नीरव मोदी, मेहुल चोकसी याच्यासोबतच भाजपच्या मित्रांची नावं ‘बँकेच्या चोरांच्या’ यादीत समाविष्ट केली आहेत, असं ते म्हणाले होते. अशा प्रकारे देशातील जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. ज्यावर आता खुद्द देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी थेट शब्दांत उत्तर दिलं आहे.
एकामागून एक ट्विट करत या शृंखलेतून त्यांनी काँग्रेसवरही कडाडून टीका केली. विजय मल्ल्यापासून नीरव मोदीपर्यंत भाजप सरकारने कर्ज वसुलीसाठी नेमकी किती आणि कशी पावलं उचलली हे त्यांनी सांगितलं.





