राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रॉनिक टोल सुरू, तब्बल १ कोटी १० लाख फास्टॅग वितरीत

राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रॉनिक टोल सुरू केल्यानंतर आतापर्यंत तब्बल १ कोटी १० लाख फास्टॅग वितरीत करण्यात आले आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार निरनिराळ्या फास्टॅग विक्री केंद्रांमधून आता पर्यंत १ कोटी १० लाख फास्टॅग देण्यात आले आहे.
दररोज दीड ते दोन लाख फास्टॅगची विक्री होईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात येत आहे. नव्या डिजिटल व्यवस्थेला जनता स्वीकारत आहे. याचाच परिणाम टोल वसुलीवर झाला असून दररोज होणारी टोल वसूली ४६ कोटी रूपयांवर पोहोचली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं १५ डिसेंबरपासून देशभरातील ५२३ टोल नाक्यांवर फास्टॅग सेवा सुरू करण्यात आली आहे. तसंच फास्टॅगच्या साहाय्यानं टोल वसूली सुरू करण्यात आली आहे. फास्टॅगद्वारे टोल वसूली सुरू केल्यानंतर फास्टॅगद्वारे टोल वसूली दररोज २४ लाखांपर्यंत पोहोचली आहे. तसंच याद्वारे टोल भरण्यामध्ये प्रवाशांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रयत्नशील आहे. आतापर्यंत आलेल्या सुचनांवरही काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.





