राष्ट्रपती ट्रम्प यांना धक्का, मिशिगन-जॉर्जियामधील केसेस कोर्टानं फेटाळल्या
![Donald Trump's 'Twitter' from Twitter is permanently closed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/trump-1.gif)
अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातील लढत चुरशीची झाली आहे. आता बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, मात्र ट्रम्प मतगणनेच्या विरोधात कोर्टात गेल्यानं अंतिम निकाल येण्यासाठी वेळ लागत आहे. दरम्यान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने दाखल केलेल्या मिशिगन आणि जॉर्जियामधील केसेस कोर्टाने फेटाळल्या आहेत. ट्रम्प यांनी या दोन्ही राज्यांमधील पोस्टल बॅलेट मतगणना थांबवण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी कोर्टाने फेटाळली आहे.
दुसरीकडे जो बायडन यांनी आपल्या समर्थकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कायद्याच्या लढाईमध्ये मदतीसाठी बायडन यांनी आवाहन केलं आहे.अमेरिकेत कायद्याची लढाई लढणं हे फार खर्चिक आहे. यासाठी जवळपास 75 कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो. त्यामुळं ट्रम्प कोर्टात गेल्यानंतर बायडन यांच्या टीमनं तात्काळ ‘बायडन फाईट फंड’ स्थापन केला आहे. बायडन यांच्यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन या माध्यमातून केलं आहे.