Breaking-newsताज्या घडामोडी
राजीव गांधी फाऊंडेशन प्रकरण; सत्यासाठी लढणाऱ्यांना घाबरवलं जातंय : राहुल गांधी

नवी दिल्ली | केंद्र सरकारने राजीव गांधी फाऊंडेशनसह नेहरु-गांधी कुटुंबीयांशी संबधित तीन ट्रस्टच्या चौकशीसाठी गृहमंत्रालयाची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती गांधी कुटुंबियांचा संबंधित राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या सर्व संस्थांच्या कारभाराची चौकशी करणार आहे. या फाउंडेशनच्या 2005-06 दरम्यान चीनकडून झालेल्या फंडिंगबाबत चौकशी केली जाणार आहे. घाबरवण्यासाठी ही कारवाई केल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं तर, “मिस्टर मोदी यांना वाटतं की सर्व जग त्यांच्यासारखं आहे. त्यांना असं वाटतं की, प्रत्येकाची काही किंमत आहे किंवा प्रत्येकला घाबरवलं जाऊ शकतं. मात्र ते कधीही हे समजू शकणार नाही की सत्यासाठी जे संघर्ष करतात त्यांना घाबरवलं जाऊ शकत नाही.”





