राजस्थानमध्ये एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार
![Four women from the same family were raped in Rajasthan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/rape-case_201707340.jpg)
दौसा – एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार करण्यात आल्याची माणुसकीला काळिमा फासणारी अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. विष्षू गुर्जर असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,06,67,736 वर
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.आरोपी एक वर्ष कुटुंबातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. त्याचवेळी तो महिलेच्या लहान बहिणी आणि मुलीलाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. महिलेला याची माहिती मिळताच तिने पोलीस गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. महिलेने तक्रार दिल्यानंतर कुटुंबातील इतर महिला पुढे आल्या आणि आरोपीविरोधात तक्रार दिली. आरोपीविरोधात याआधी २३ आणि २४ जानेवारीला बलात्काराच्या दोन तक्रारी दाखल आहेत. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.