मोदी सरकारने देश आणि घराचे बजेट खराब केलं, राहुल गांधींचा हल्लाबोल
नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ होतेय. त्याचप्रमाणे घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमतीही कासव गतीने वाढत आहेत. यावरून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहेशनिवारी राहुल गांधी ट्विट करत म्हटलं की, मोदी सरकारने देश आणि घराचे बजेट खराब केले आहे.
सलग दोन दिवस इंधन दरवाढ
गुरुवार आणि शुक्रवारी सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यामुळे किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत आहेत. शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 30 पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात आली. या वाढीनंतर राज्यात पेट्रोलची किंमत राज्यात विविध ठिकाणी 94 रुपयांच्या पुढे गेली आहे तर डिझेलची किंमत 84 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
मोदी सरकार ने बजट बिगाड़ दिया-
देश और घर, दोनों का! pic.twitter.com/6GPrNwFuPm— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 6, 2021
एलपीजी सिलेंडर 25 रुपयांनी महाग
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असतानाआता एलपीजी सिलेंडरच्या किंमतीही गुरुवारी वाढल्या. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही प्रति सिलिंडरमध्ये 25 रुपये वाढ करण्यात आली. त्यामुळे घराचं बजेटही बिघडलं आहे.




