मी भाजपचा कार्यकर्ता, भाजप सोडणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/vikhe-patil-Frame-copy.jpg)
शिर्डी | विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरवापसीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र या चर्चांना स्वत: राधाकृष्ण विखे पाटलांनी पूर्ण विराम दिला आहे. मी भाजपमध्ये राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. माझी बदनामी करण्यासाठी अशा बातम्या येत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितले आहे.
काँग्रेसची भूमिका मी प्रभावीपणे राबवली होती. काही अडचणींमुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. आता मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मात्र भाजप सोडण्याच्या ज्या चर्चा होत आहेत त्या दुर्दैवी आहेत. मी भाजपमध्येच राहणार आहे. माझी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट सुद्धा झालेली नाही, त्यामुळे अशा चर्चांमध्ये तथ्य नाही. माझी बदनामी करण्यासाठी अशा बातम्या येत आहेत. अशा चुकीच्या बातम्या पसरवण्याऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं.