Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

माफी मागा, अन्यथा बदनामीचा दावा दाखल करू – हसन मुश्रीफ

कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज संध्याकाळपर्यंत माफी मागावी, अन्यथा बदनामीचा दावा दाखल करू, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास विभागाबद्दल माध्यमांना चुकीची माहिती दिली. अपुऱ्या माहितीवर प्रतिक्रिया देऊन चंद्रकांत पाटील यांनी हसं करून घेतलं, असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
केंद्र सरकारने वित्त आयोगाचे ग्रामपंचायतींना दिलेले पैसे राज्य सरकार कसे वापरू शकते? हे पैसे राज्य सरकारने घेता कामा नये, ते परत ग्रामपंचायतींना मिळाले पाहिजेत. वित्त आयोगाने मांडलेल्या प्रस्तावावर हसन मुश्रीफ यांनी सत्कार करून घेतला. यात मुश्रीफ यांचं काहीही काम नाही, त्यांनी श्रेय घेऊ नये, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button