TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

महागाईचा भडका; आता दूध, साखर, चहा पावडरची भाववाढ

नवी दिल्ली : अधिच महागाईचा फटका बसत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून त्यात आणखीणच वाढ होताना दिसत आहे. आता भाज्या आणि डाळीनंतर साखर, दूध आणि चहा पावडरच्या किंमतीतही वाढ झाली आहे. देशातील किरकोळ बाजारात साखरेची सरासरी किंमत 39.68 रुपये प्रति किलो होती, ती 7 डिसेंबरला 43.38 रुपयांवर गेली आहे. याचबरोबर, खुल्या चहाच्या दरातही 11.57 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चहाच्या पावडरचे दर 238.42 रुपयांवरून 266 रुपयांवर गेले आहेत. याशिवाय,दुधाच्या किंमतीतही जवळपास 7 टक्के वाढ होत आहे. दुधाची किंमत 46.74 रुपयांवरून 50 रुपये प्रति लीटर झाली आहे. टोमॅटोच्या किंमतीतही वाढत होत आहे. 30 नोव्हेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत टोमॅटो 37.87 टक्के महाग झाले आहेत. दरम्यान, 30 नोव्हेंबरला टोमॅटोची किंमत किरकोळ बाजारात सुमारे 49.88 रुपयांवर पोहोचली आहे.

तेल, पीठ, तांदूळ आणि गहूच्या किंमतीत दिलासा

मागील काही दिवसात खाद्य तेलांच्या दरात घट झाली आहे. पाम तेलाची किंमत 102 रुपयांवरून 92 रुपयांवर आली आहे. सूर्यफूल तेलाची किंमत 124 रुपयांवरुन 123 रुपयांवर आली आहे. शेंगदाण्याचे तेल 156 रूपयांवरून 145 रुपये आणि मोहरीचे तेलही प्रति लिटर 135 रुपयांवरून 132 रुपयांवर आले आहे.

मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गव्हाच्या किंमतीत सुमारे 19.45 टक्क्यांनी घट झाली आहे. यावेळी गव्हाची किंमत 29 रुपयांवरुन 24 रुपयांवर गेली आहे. याशिवाय, किरकोळ बाजारात पीठाची किंमत 32 रुपयांवरुन 28 रुपयांवर गेली आहे. तसेच,तांदळाचे दरही घसरले आहेत. तर हरभरा आणि उडीद डाळ स्वस्त झाली. 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button