breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

ब्रिटनहून आलेले २० प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू हा आधीच्या कोरोनापेक्षा झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. मात्र कोरोना विषाणूची नवी प्रजाती आढळून आल्यानंतर ब्रिटनमधून भारतात आलेले तब्बल 20 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात सोमवारी रात्री दिल्लीत लँड करणारे 6, रविवारी रात्री कोलकाता येथे येणारे 2, मंगळवारी अहमदाबाद येथे येणारे 4 आणि आज अमृतसरला आलेल्या एका क्रू मेंबरचा समावेश आहे. हे सर्वजण एअर इंडियाच्या विमानाने लंडनहून भारतात आले होते. दरम्यान, भारताने 23 ते 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनहून येणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द केल्या आहेत.

भारत आणि ब्रिटनमधील विमानसेवा बुधवारपासून 31 डिसेंबपर्यंत बंद राहणार आहे. मंगळवारी ब्रिटनमधून भारतात असंख्य प्रवासी दाखल झाले. कोरोनाचा नवा प्रकार रोखण्यासाठी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली असून त्यामध्ये 20 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांना कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाला आहे की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या रुग्णांच्या माध्यमातून नव्या कोरोना विषाणूने भारतात शिरकाव तर केला नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button